डांग सेवा मंडळ, नाशिक या संस्थेच्या पेठ यथील दादासाहेब बिडकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,नियोजन व गुणवत्ता विकास विभागाच्या वतीने व दादासाहेब बिडकर महाविद्यालय,पेठ यांच्या सयुंक्त विद्यमाने महाविद्यालय गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत आज दिनांक ११/०७/२०२५ रोजी महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात स्त्री रोग तज्ञ डॉक्टर निवेदिता पवार ,मनीषाताई घोलप, सुरेखाताई दुमणे, संस्थेच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, प्राचार्य डॉ. नरेंद्र पाटील,राजेंद्र म्हसदे,आदित्य पवार,द्वारकानाथ गोंदके, प्राचार्य अशोक नंदन,डॉ.गणेश रुपवते,रामदास शिंदे आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पुजन व दीप- प्रज्वलनाने आणि विद्यापीठ गीताने झाली.
